सर्वात वर

महाराष्ट्रात लॉक डाउन बाबत २ दिवसात निर्णय

संपूर्ण लॉक डाउनला भाजपाचा विरोध 

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर स्थिती झाली असून महाराष्ट्रात लॉक डाउन (Lock Down) बाबत २ दिवसात निर्णय घेणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले आहे.महाराष्ट्रात कोरोनाच्या गंभीर परिस्थीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. उद्या टास्क फोर्स ची बैठक घेऊन सर्वसामान्य लोकांना काय मदत करता येईल याचा विचार करून त्यानंतर लॉक डाऊन बाबत निर्णय घेण्यात येईल असे सूत्रांकडून समजते आहे.जवळपास सव्वा दोन तास ही बैठक सुरु होती.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले 

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बघता “लॉकडाऊन (Lock Down) करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.दोन दिवसापूर्वीच मुखमंत्र्यांनी लॉक डाउन बाबत संकेत दिले होते. निर्बंध आणि सूट एकत्र शक्य नाही त्यामुळे थोडी कळ सोसावी लागेल असे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला कडक निर्बंध लावू आणि एकएक गोष्ट पुन्हा सुरु करू असे हि मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांकडून समजले. 

नवीन स्ट्रेंन लसीला ही जुमानत नाही मी लसीचा दुसरा डोस घेतला तरी अँटीबॉडीज तयार झाल्या नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले 
कोरोनाची चेन तोडायची असेल तर कमीत कमी १४ दिवसाचा लॉक डाउन (Lock Down) ठेवावा लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सर्वांची मत जाणून घेतली त्यानंतर उद्या प्रशाकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन २ दिवसात हा निर्णय घेणार असल्याचे समजते आहे.   

लॉक डाउन नाही केले तर १५ ते २१ एप्रिल दरम्यान परिस्थिती गंभीर होईल त्यामुळे राज्यात लॉक डाउन (Lock Down) शिवाय पर्याय नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. कोरोनाचा एक रुग्ण अनेक जणांना बाधित करतो आहे कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतो आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे.कार्यालयाच्या वेळा निश्चित करणे गरजेचे आहे.असे ही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

तरुणांमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरोना पसरतो आहे. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉक डाऊन गरजेचा आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

काय घडले बैठकीत 

* बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रझेंटेशन केले आणि महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला 

* सर्वांचे मत ऐकून मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल असे अजित पवारांनी बैठकीत सांगितले. रेमेडिसीवर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबतीत नियमावली हवी. काही ठिकाणी डॉक्टरांचे मानधन कमी आहे तेथे ही लक्ष दिले पाहिजे तसेच गरीब वर्गाला मदत केली पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे असे ही अजित पवार यांनी म्हटले आहे.

* राज ठाकरे आज लीलावती हॉस्पिटल मध्ये ऍडमिटआहेत  यांच्या हातावर शस्त्रक्रिया होणार असल्याने ते या बैठकीत उपस्थित नव्हते.

* भाजपा ने या संपूर्ण लॉक डाऊन ला विरोध केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉक डाउनला विरोध दर्शवला आहे.केंद्राकडून मदतीची अपेक्षा करत असाल तर केंद्राकडे बोट दाखवणे कमी करा असे फडणवीस यांनी सांगितले. 

*  महिन्याला १ लाख  रेमेडिसीवर इंजेक्शन महाराष्ट्राला लागणार असून त्याची निर्यात थांबवा असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबई पुण्यात रुग्णाचे ट्रेसिंग अवघड आहे असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

* ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची माहिती सरकारने जाहीर करावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. लॉक डाउन मुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे असे हि ते म्हणाले. कष्टकरी कामगारांचा ही विचार करून त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला तर उपयोग होणार आहे. 

*सध्यातरी लोकांचा जीव वाचवणे हि प्राथमिकता आहे असे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

*आमदारांचा २ कोटीचा निधी कमी करून प्रत्येकी ५ हजार रुपये द्या असे भाजपाचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

* काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कठोर पावले उचलावी लागेल असे सांगितले. 

* मध्य मार्ग काढावा लागेल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.