सर्वात वर

डॉ. प्रदीप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे तर्फे कोविड सेंटरला आवश्यक उपकरणांची भेट

नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेत्तृत्वाखाली मनसैनिक कोविड रुग्णांच्या मदतीला 

नाशिक : नाशिक मध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते, आरोग्यदूत डॉ. प्रदीपचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मनपाच्या विविध कोविड सेंटरला (Covid Center) आवश्यक उपकरणांची भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आली.

जागतिक कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील व राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रचंड त्राण पडला असून एवढ्या मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांच्या घसाऱ्या मुळे विविध रुग्णालयांमध्ये रुग्ण  व त्यांच्या नातेवाईकांना अनेक लहान मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निस्वार्थपणे गोरगरीब रुग्णांची मदत केली होती. आताही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, आरोग्यदूत डॉ. प्रदीपचंद्रजी पवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास फाटा देत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी वॉटर डिस्पेन्सर, व्हीलचेयर, पेंडस्टर पंखे आदी उपकरणे बिटको कोविड सेंटर (Covid Center) प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार,जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले आदी होते तर कार्यक्रमाचे आयोजन मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, शहर सरचिटणीस गोकुळ नागरे, मनसे ना.रोड मा. विभागीयध्यक्ष साहेबराव खर्जुल, मनसे रोजगार स्वयंरोजगार सेना शहाराध्यक्ष सिद्धेश सानप आदींनी केले होते.

त्याचप्रमाणे सातपूर कोविड सेंटर (Covid Center), भद्रकाली पोलीस  स्टेशन, सरकारवाडा पोलीस स्टेशन, संभाजी स्टेडियम कोविड सेंटर आदी ठिकाणीही वॉटर डिस्पेन्सर, व्हीलचेयर, पेंडस्टर पंखे आदी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी  आवश्यक साहित्यांचे वितरण मनसेतर्फे करण्यात आले. नवीन नाशिक येथील छत्रपती संभाजी महाराज कोविड सेंटरला विविध उपकरणांचे वितरण म.न.पा उपायुक्त शिवाजी आमले व नवीन नाशिक विभाग अधिकारी ह्याच्या उपस्थितीत करण्यात आले.

या प्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसे नगरसेवक योगेश शेवरे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, रामदास दातीर, शहर संघटक संजय देवरे, मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, मनविसे शहराध्यक्ष संदेश जगताप, मनविसे शहर सरचिटणीस पंकज बच्छाव, मनोज सोनवणे, मेघराज नवले, अक्षय आहेर, राहुल गोसावी, दीपक एलमामे, बबलू ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.