सर्वात वर

दुधी भोपळा दशमी

शीतल पराग जोशी 

साहित्य:- 1 दुधी भोपळा, 3 वाटी कणिक, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून धणे, जिरे पूड, 1 टीस्पून गोडा मसाला,  मीठ, तेल

Dudhi Bhopla Dashmi

कृती:- (Dudhi Bhopla Dashmi) ताजा हिरवा दुधी भोपळा घेऊन तो धुउन किसून घ्यावा. नंतर दुधीचा किस दाबून त्यातील पाणी  काढून ते एका बाउल मध्ये काढून  ठेवावे. ते पाणी फेकू नये. हा दुधीचा किस, कणिक, तिखट, हळद, मीठ, धने,जिरे पूड, गोडा मसाला, थोडे तेल टाकून भिजवून घ्यावे. दुधीचे काढलेले पाणीच कणिक भिजवताना घालावे. खूप सैल पीठ भिजवू नये. कणिक घट्टच भिजवावी. मग त्याचे गोळे करून जाडसर दशमी अथवा पराठे लाटावे. तव्यावर ही दशमी टाकून दोन्हीकडून तेल टाकून भाजून घ्यावी. खूप मऊसूत अशी दशमी (Dudhi Bhopla Dashmi) तयार होते. अजून पौष्टिकता वाढवायची असेल तर आपण भाजणी पीठ वापरू शकतो.  भाजणी कशी करायची ते पुढच्या भागात सांगेल. दुधीची भाजी सगळ्यांना आवडतेच असे नाही. पण अशी दशमी सगळे आवडीने खातात. दशमी बरोबर अशी हिरवी पातळ चटनी खूप छान लागते. ती कशी करायची ते आता सांगते.

चटणी 

साहित्य:- 5 हिरव्या मिरच्या, 5 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरे,  1 मूठ कोथिंबीर, 2 चमचे दाण्याचा कूट, मीठ, तेल, मोहोरी, जिरे, हिंग

कृती:- प्रथम मिरच्या धुवून घाव्यात. कोथिंबीर धुवून घ्यावी. नंतर हे चिरून घ्यावे. त्यात 5 लसूण पाकळ्या,जिरे ,मीठ घ्यावे.दाण्याचा कूट घ्यावा. हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडे पाणी घालावे. मिक्सरला बारीक चटणी दळून घ्यावी. अशी हिरवी चटणी खूप मस्त लागते. एक छोटी कढई घेऊन त्यात तेल टाकून ते तापले की त्यात जिरे, मोहोरी, टाकून ते तडतडले की त्यात थोडा हिंग टाकून ही चटणी टाकावी. खूप छान लागते.चटणी जास्त हवी असल्यास मिरच्या जास्त घेऊ शकतात.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२