सर्वात वर

शिवसेना आमदारांच्या घरावर ED चा छापा

मुंबई- शिवसेनेचे ठाण्याचे आमदार आणि पक्ष प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या घरी ED चे पथक पोहचले आहे.ईडीचे हे पथक कोणत्या करण्यासाठी पोहचले आहे याबाबत अद्याप कोणती हि अधिकृत माहिती समोर आली नसली तरी मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे असे समजते आहे. 

प्रताप सरनाईक हे बांधकाम व्यावसायिक आहेत. शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता शिवसेनेकडून केला जातोय. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी शोधमोहीम सुरु करण्या आली. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.