सर्वात वर

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

जळगांव- नुकतेच भाजपाला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली आहे. 

येत्या ३० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात आदींचा समन्स मला मिळाला असून समन्स नुसार मी हजर राहणार आहे.ईडी सांगेल त्या प्रमाणे मी त्यांना मदत करायला तयार आहे असे एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी सांगितले आहे. या पूर्वी पुणे आणि नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशी दरम्यान मी सर्व कागदपत्रानुसार हजर राहिलो होतो. 

आता हि चौकशी भोसरी येथील भूखंडा संदर्भातील असून या आधी चार वेळेस मी हजर होतो. आता ही पाचवी वेळ आहे.आणखी चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे. त्यामुळे ईडीकडून मिळालेल्या सूचने नुसार आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेल.आता मी सध्या ईडीच्या चौकशीला सामोरे जात असून सिडीचं ..! नंतर बघू अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत  दिली आहे.