सर्वात वर

Colors वर येतयं नवी मालिका ‘नमक इश्क का’

मुंबई-कलर्स हिंदी वाहिनी वर लवकरच नमक इश्क का ही नवी मालिका येते आहे. या मालिकेत श्रुती शर्मा छमछमच्या भूमिकेत दिसणार आहे.Colors ने नमक इश्क का च्या शुभारंभाची तयारी केली आहे,श्रुती शर्मा एक रोमँटिक नाट्य सादर करत, भपकेबाज छमछमचा प्रवास, जिच्याकडे तिच्या धंद्यामुळे लोक तिरस्काराने पाहतात, पण तिचे लग्न मुंबईतील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाले आहे. जरी छमछम परंपरेने नाचणारी म्हणून ओळखली जात असलेली एक नर्तिका असली तरी, ती विचारी आणि नैतिकदृष्ट्या नीतीमान व्यक्ती आहे. एक अनाथ म्हणून वाढलेली छमछम पोट भरण्यासाठी आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्यांची काळजी घेण्यासाठी नर्तिका बनते. छमछमची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री श्रुती शर्माची निवड करण्यात आली आहे.

श्रुती शर्मा 

या भूमिकेबाबत श्रुती शर्मा म्हणाली,“ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. छमछम हे खूप असाधारण पात्र आहे आणि ते साकारताना मला एक अभिनेत्री म्हणून अभिनयासाठी खूप वाव आहे. शोची संकल्पना खूप सशक्त आहे आणि या पात्राची पार्श्वभूमी आणि तिचा प्रवास नक्कीच सामाजिक समज बदलून टाकतील. ही खूप वैशिष्ट्यपूर्ण संधी मला देण्यासाठी मी कलर्सची अत्यंत आभारी आहे आणि शो मध्ये काम करण्याची आणि त्यात माझे सर्वस्व ओतण्याची मी वाट पहात आहे.”