सर्वात वर

नेत्रविकार व आयुर्वेद

डॉ.राहुल रमेश चौधरी

साधारणत: डोळ्यांच्या समस्यांबाबत रुग्ण डोळ्यांचेच डॉक्टर निवडतात.लहान सहान समस्या करिता आपल्याला बराच वेळ वाट बघत बसावी लागते.आयुर्वेदात डोळ्यांच्या आजारां करीता( Eye Disorders ) उपचार आहेत हे खूप जणांना माहीतच नसते किंबहुना कोणालाच कल्पना नसते.आयुर्वेदात डोळ्यासाठी उपचार आहेत हे लोकांना माहीत नसण्याची बरेच कारणे आहेत,त्याची चर्चा करण्याचे हे व्यासपीठ नाही.असो,डोळ्यांचे आजार(Eye Disorders )सर्वश्रुत आहेतच पण त्यावर आयुर्वेद काय काय उपचार करू शकते याची माहीती आपण या लेखात घेवूयात.

डोळ्यांचे विकार( Eye Disorders )म्हणजे काय ?

डोळा हा मानवी शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव आहे.या अवयवाला हानी पोहचली तर बरेच कामे ही अपूर्ण राहतात.आयुर्वेद शास्त्रा नुसार म्हटले जाते कि डोळ्याला कफ दोषापासून जास्त भय असते.ह्याच दोषामुळे बरेच आजार डोळ्यामध्ये निर्माण होतात.मग ते डोळ्यांतून पाणी येणे असो का ते मोतिबिंदू,काचबिंदू असो….


डोळ्याच्या आजार निर्माण होण्याकरिता कोणती कारणे असतात ?

१.दिर्घकालीन आजार जसे कि मधुमेह,उच्चरक्तदाब इत्यादी

२.डोळ्याला आघात होणे

३.जोरात वार लागणे

४.खूप उन्हात,आगीजवळ काम करणे

५.laptop,mobile,TV सारख्या उपकरणांचा अतिवापर करणे

६.खूप थंड पाण्याने आंघोळ करणे,खूप थंड पाणी पिणे

७.सतत प्रवास करणे

८.साथीच्य रोगात ज्यांना साथीचे रोग झाले आहेत अश्यासह राह

९.केमिकल युक्त पदार्थ डोळ्यांत उडणे.,त्याने डोळ्यांना ईजा होणे.

१०.रात्री खूप जागरण करणे,खूप रडणे

११.अतिशय क्लेदजन्य म्हणजेच कफकारक असे आहार सेवन करणे

१२.कोणत्याही कामाचे हात न धुता डोळ्यांना लावणे.

१३,वाढ्त्या वयानुसार डोळ्याची शक्ती ,नजर कमी होणे

१४.आनुवंशिकता

१५. शरीरात आवश्यक घटकांची कमतरता जाणवणे

१६.सतत सूक्ष्म निरिक्षण करणे,बाष्पाचे सेवन केल्याने,अतिमैथुन केल्याने,अतिशय् आंबट,खारट पदार्थ सेवन केल्याने१७.उलटी होत असतान देखिल रोखून धरल्याने,लघवी-शौचास रोखून धरल्याने……….डोळ्यांचे आजार निर्माण होतात


डोळ्यांच्या आजारांची लक्षणे काय काय दिसतात.?

१.डोळ्यातून सतत पाणी येणे

२.डोळ्यातून सतत चिकट स्त्राव येणे

३.डोळ्यांना लालसर पणा असणे

४.डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे५.नजर कमी होणे

६.डोळ्यांची आग होणे

७.डोळ्यांचे प्रेशर वाढणे

८.डोळे जड पडणे,डोळ्यांना सतत खाज येणे

९.डोळ्यांत सुई टोचल्याप्रमाणे वाटाणे,डोळ्यांत सतत कचरा आहे असे वाटणे,डोळ्यासमोर सतत काळा ठिपका,जाळे दिसणे

१०.डोळ्याचा नंबर कमी किंवा जास्त होणे

११.डोळे कोरडे पडणे

१२.डोळ्यांना प्रकाश सह्न न होणे

१३.फक्त रात्रीच न दिसणे

१४.डोळ्यांचे पडदे खराब होणे१५.अंधूक दिसणे

आधुनिक उपचार पध्दतीत काय उपचार होतात?

आधुनिक उपचार पध्दतीत डोळ्यांचे ऑपरेशन,antibiotic चे drops,ointments,steroids,दिर्घकालीन आजारांकरिता औषधोपचार,सध्या नवीन युगात अतिशय कमीत क्मी वेळात operations ची पध्दत अवगत झाली असल्याने रुग्णास पूर्विसारखा वेळ लागत नाही.


आधुनिक तपासण्या कोणकोणत्या केल्या जातात?

Routine blood investigations सह अत्याधुनिक तपासण्या ज्या डोळ्यांच्या अतिसूक्ष्म अवयवांचे निरिक्षण करतात. त्यात A-scan, B-scan, pachymetry,keratometry,AS-OCT(anterior segment optical coherence tomography,OCT,tonometry,visual feild analyasis,electro retinography,multifocal ERG,ultra biomicroscopy,fluorescein fundus angiography,HRT/GDX, यासारख्या अनेक तपासण्या केल्या जातात.


आयुर्वेद शास्त्रा नुसार उपचार कोणते ?

आयुर्वेद शास्त्र औषधे,पंचकर्म,आहार,योगा,रसायन या ५ स्तरावर काम करते.

१.औषधे- डोळ्यांची नजर व्यवस्थित करण्याकरीता,दोष नाहीसे करण्याकरिता औषधे दिलि जातात त्यात सप्तामृत लोह,पंचामृत लोह गुग्गुळ यासारख्या औषधांचा समावेश होतो,याशिवाय मधुमेह ,उअच्च रक्तदाब या आजारांवरील औषधे सोबत दिलि जातात.

२.पंचकर्म-औषधांपेक्षा डोळ्यांच्या विकारात पंचकर्म उपचारांचे महत्व जास्त आहे.नेत्र म्हणजेच डोळ्यांच्या उपचारांतर्गत तर्पण,पुटपाक,आश्चोतन,विरेचन,रक्तमोक्षण ,जलौकावचारण्,बिडालक,पिण्डी,अंजन,वर्ती असे लघु व मोठे कर्म येतात, नेत्राच्या आजाराच्या तीव्रतेनुसार हि पंचकर्मे केली जातात.


तर्पण-पुटपाक.

तर्पण पुटपाक म्हणजे काय?

तर्पण पुटपाक म्हणजे डोळ्यांच्या आजाराकरीता डोळ्यांभोवती पाळे लावून त्या खोलगट भागात औषधी द्रव्यांचा काढा,रस,तूप,तेल,मांसरस इत्यादी द्रव्ये आजारानुसार काही काळ अपेक्षित लक्षणे दिसेपर्यत ठेवतात त्यास तर्पण-पुटपाक असे म्हणतात.तर्पण पुटपाक करण्याचा काळ कोणता??-तर्पण पुटपाक खुप थंड किंवा खुप उष्ण ऋतुत आणि पावसाळा नाही करत, बाकी ऋतुत करणे योग्य.


 तर्पण पुटपाक कोणत्या आजारांवर करतात??

चष्म्याचा नंबर वाढणे,डोळ्यांना अंधूक/धूसर दिसणे,रातांध्यता,डोळ्यातून सतत पाणी येणे,मधुमेहामुळे नजर कमी होणे,डोळ्यांचे पडदे खराब होणे इत्यादी डोळ्यांच्या आजारांवर तर्पण पुटपाक केले जाते.

*आश्चोतनआश्चोतन म्हणजे डोळ्यात औषधी द्रावांचे थेंब टाकले जातात.

*सेचनयात बंद डोळ्यावर किंवा डोळ्यावर औषधी द्रव्याची धारा केली जाते.

*विरेचन-रक्तमोक्षण-जलौकावचारणयात पित्त व रक्त दुष्टी मुळे डोळ्यांच्या आजाराला बरे केले जाते.

*बिडालक-पिण्डीडोळ्याच्या भोवती औषधी द्रव्यांचा जो लेप केला जातो त्यास बिडालक म्हणतात.पिण्डी म्हणजे पोट्टली डोळ्याच्या दुखऱ्या भागावर औषधी द्रव्याच्या चूर्णाची पोट्टली औषधी द्रव्यात बुडवून ठेवली जाते.

अंजन-वर्ती

औषधी द्रव्यांची अंजने व वर्ती प्रयोग वेगवेगळ्या काचबिंदू,मोतीबंदू या सारख्या आजारांवर करतातडोळ्यांची उपचार योग्य पध्दतीने केल्यास operation पासून वाचता येते.

रसायनडोळ्यांचे आजार एकदा बरे केल्यावर पुन्हा होवूच नये याकरीता दीर्घाकाळ डोळ्यांचे पोषण व शक्ती वाढवण्याकरीता औषध दिले जाते त्यास रसायन म्हणतात.

.योगाडोळ्यांची शक्ती तीव्र करण्याकरीता त्राटक सारखे योगा अत्यावश्यक आहे,तसेच डोळ्यांचे डॉक्टरांनी सांगीतलेले सुलभा व्यायाम व पथ्य गरजेचे आहे.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari

डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क-9096115930

ई-मेल-[email protected]