सर्वात वर

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

 मुंबई – पूजा चव्हाण (Pooja Chavhan )आत्म्यहत्या प्रकरणातील वादग्रस्त मंत्री संजय राठोड (sanjay Rathod) यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे.आज काही वेळा पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे.असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. काही वेळात मुखमंत्री उद्धव ठाकरे या बाबत अधिकृत घोषणा करतील असे सूत्रांकडून समजते आहे. 

उद्या पासून महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार होते. भाजपाने  संजय राठोड यांच्या राजीनाम्या शिवाय अधिवेशन होऊ देणार नाही असे अल्टिमेटम दिल्यामुळे हा राजीनामा दिला आहे असे बोलले जात आहे.आज सकाळीच शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सूचक ट्विट करून संजय राठोड  (sanjay Rathod)  हे राजीनामा देऊ शकतात असे अप्रत्यक्षपणे याचे सूतोवाच केले होते. 

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा म्हणून मागणी केली होती संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

निपक्षपणे चौकशी करण्यासाठी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. गेल्या ३० वर्षपासून मी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असून मला राजकीय जीवनातून संपवण्याचा विरोधकांचा डाव आहे असे वनमंत्री संजय राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असून संजय राठोड यांच्या बाबत मुख्यमंत्री आपला निर्णय जाहीरकरणार आहेत.