सर्वात वर

२१ जून पासून १८ वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देणार

दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य : केंद्रसरकारची घोषणा  

नवी दिल्ली – येत्या  २१ जून पासून देशातील १८ वर्षावरील भारतातील सर्व नागरीकांना केंद्र सरकार मोफत लस देणार आज जनतेला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ही घोषणा केली आहे,लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून त्यांच्या एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के लस केंद्र सरकार खरेदी करणार असून ती लस राज्यांना मोफत देण्यात येणार आहे. आता जी जबाबदारी राज्यांना दिली होती, राज्यांना दिले गेलेले २५ टक्के केंद्र सराकरचं पुन्हा हातात घेईल. २ आठवड्यानंतर  केंद्र सरकार संपूर्ण लसीकरणाचे  काम बघेल.योगा दिनानंतर राज्यांना मोफत लस देणार आहे. राज्य सरकारांना लसीसाठी खर्च करण्याची गरज नाही असे ही पंतप्रधानांनी सांगितले. 

भारतात गेल्या १०० वर्षात अशी महामारी आली नव्हती.या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारतात २ मेड इन इंडिया लसी  तयार करण्यात आल्या, यावरुन भारत इतर देशांच्या तुलनेत कमी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.देशात सात कंपन्या विविध लशींची निर्मिती करीत आहे, तीन लशींचं ट्रायल एडव्हास ट्रॅकवर सुरू आहे. देशात आता पर्यंत २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असले तरी सर्वांना लवकरात लवकर लस मिळावी म्हणून परदेशातून लस भारतात आणण्यावर भर दिला जात आहे.

तसेच देशातील गरिबांना दिवाळी पर्यंत मोफत धान्य देण्यात येईल याचा लाभ देशातील ८० कोटी नागरिकांना मिळेल असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सांगितले.