सर्वात वर

ग्रेप फ्रूट ( Grape fruit) -(आहार मालिका क्र – २०)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

दोन जातीपासून एकत्रीत संकरीत असलेल्या व रुटेसी फॅमीलीतील असलेल्या ग्रेप फ्रूट ( Grape fruit) ची आज आपण माहीती घेवूयात.ग्रेप फ्रूट च्या रसाचा उपयोग आरोग्यदायी पेय म्हणून बऱ्याच वर्षांपासून केला जातो आहे.हे फळ संत्र्याच्या आकाराचे असून रंग हा या फळाचा पिवळा आहे. क जीवनसत्व विपुल असलेल्या या फलरसाचे सेवन कोरोना काळात विदेशात भरपूर केले जात आहे.

ग्रेप फ्रूटचे ( Grape fruit) आरोग्यास फायदे    

१.या फळाचे आहार मूल्य प्रति १०० ग्रॅम ३३ किलोकॅलरी इतके आहे.या फळात जीवनसत्व ब १,२,३ याशिवाय जीवनसत्व ई व सर्वाधिक जीवनसत्व क ४० ग्रॅम इतके मिळते.याशिवाय यामध्ये कॅल्शिअम,लोह,मॅग्नेशिअम,मॅन्गेनीज,पोटॅशिअम मिळते.

२.या फळात पाण्याचे प्रमाण ९०.४८% इतके आहे.

३.ग्रेप फ्रूट ( Grape fruit) वजन कमी करण्यास साहाय्यकारी आहे.

४.या फल सेवनाने अतिरिक्त भूक देखील नियंत्रणात येते.

५.यातील क जीवनसत्व दमा,संधीवात,वारंवार सर्दी यात फायदेशीर आहे असे आधुनिक विज्ञान सांगते.

६.ह्रद्यासाठी बलकारक असल्याने याचा उपयोग हृदयाच्या आजार असलेल्या पेशंटला देण्यासाठी केला जातो.

७.या फळातील पेक्टीन घटकामुळे रक्तवाहीन्यांमध्ये मेद साचण्याचे प्रमाण कमी होते.

८.हे फळ रक्तातील LDL म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल कमी करते.

९.या फळात ऍन्टीऑक्सीडंट गुणधर्माने त्वचेचे संरक्षण होते.

१० या फळातील लायकोपेन या कॅरोटेनॉईड मुळे प्रोस्टेट ग्रंथी च्या कॅन्सर ला प्रतिबंध होण्यास मदत होते.

११.याशिवाय या फळातील लिमोनॉईड या घटकामुळे शरीरात ट्युमर होण्यास प्रतिबंध होतो.

१२.कॅन्सर ग्रस्त रुग्णांमध्ये या फलरसाच्या नियमीत सेवनाने रुग्ण औषधांची मात्रा कमी होते त्यामुळे रुग्णास आरोग्याचा व आर्थिक बचतीचा फायदा होतो.

१३.आयुर्वेदात सदर फळावर संशोधन चालू स्थितीत असताना हे फळ आतापर्यत कफ दोषहर व रसायन म्हणून संशोधानात प्राथमिक रीत्या म्हटाले आहे.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०