सर्वात वर

अळूचे आरोग्यास फायदे -(आहार मालिका क्र – २४)

डॉ. राहुल रमेश चौधरी

Health Benefits of Aloo

मिठाईच्या दुकानावर तुम्ही गोड आंबट तीळ फिरवलेल्या अळूच्या वड्या पाहील्याच असतील.या वड्या पाहील्या पाहील्या आपल्या तोंडाला पाणी सुटते.या अळूच्या भाजीचा मात्र आहारात तेवढा वापर करताना दिसून येत नाही.अळूच्या पानांच्या वड्या,अळूचे फतफते,पातळ भाजी,भजे अश्या अनेक स्वरूपात याचा वापर केला जातो.सहसा याची लागवड केली जात नाही,विहिरीजवळ-मोऱ्या-सांडपाणी-शेतात पिकांच्या दोन रांगाच्या मध्ये पाणी वाहण्याच्या नाली याच्या आजूबाजूला मुबलक प्रमाणात अळूची झाडे भरभरून वाढतात.अळूच्या कांद्याची पण भाजी करतात.यात खाजरा व बिन खाजरा असे दोन प्रकार मिळतात.काळ्या-जांभळ्या दांडीच्या हिरव्या गर्द पानांचे आळू (Health Benefits of Aloo)वापरावयास हवे याचे फायदे भरपूर आहेत.


अळूचे आरोग्यास फायदे  (Health Benefits of Aloo)

१.बाळंतीन बाईस भरपूर दूध येण्यासाठी अळूची भाजी नेहमी खाण्यास द्यावी.याने अंगावरील दूधाचे प्रमाण वाढते.

२.अळूचे कांदे शुक्र धातुची वाढ करतात.शुक्रधातु पातळ असल्यास याचा वापर करावा.

३.पोटात आग होणे,हाता-पायांची आग,रसरस होणे,डोळ्यांची आग होणे यात आळू ची भाजी,गव्हाचे फुलके,तूप खावे

४.हातापायांची तळव्याची आग,रसरस होत असल्यास अळूची पाने पाण्यास भिजवून बांधावी याने लाभ होतो.

५.अर्धे पिकलेले गळवे फुटण्याकारीता अळूची पाने देठ वाटून पोटीस बांधावे.

६.अळूचा पानांचा रस काढून घेतल्यास लघवीची आग दूर होते

७.अळूची देठ जाळून राख बनवून फोडांवर लावल्यास फोड बरे होतात.

८.अळूच्याअ कोवळी पांनाचा रस व जिरे पूड एकत्र करून पिल्यास पित्त शांत होते.

९.अळू थंड,पौष्टीक,मलावष्टंभक,शक्तीवर्धक आअहे.

निषेध

१.ह्रद्याचे विकार,पोटात गॅस होणे,भूक मंदावणे,मलावष्टंभ या लोकांनी अळूचा वापर न केलेला बरा.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०