सर्वात वर

कारल्याचे आरोग्यास फायदे – (आहार मालिका क्र – २५)

डॉ. राहुल रमेश चौधरी

कारल्याची (Bitter Gourd) भाजी म्हटले की खूप जण नाक मुरडतात,तर काही जण हौशीने खातात..मधुमेही लोकांना कारल्याची भाजी अमृत च वाटते.तर आरोग्याच्या बाबत सजग लोक कारल्याची (Bitter Gourd) भाजी आनंदाने खातात.आयुर्वेदानुसार आहारात सगळ्या सहा रसांचे सेवन असायला हवे.पण तुरट व कडू हे रस अपवादानेच शरीरात जातात त्यामुळे या रसांचे योग्य ते उपयोग शरीराला होत नाही.कारल्याची भाजी कडू रसाची असून दोन प्रकारची कारले असतात.मोठी कारली (Bitter Gourd) व लहान कारली.दोन्ही प्रकारची कारली सेवना करीता आहारात वापरली जातात.अश्या या कारल्याच्या भाजीचे उपयोग आपण पाहूयात.

१.छातीत कफ होणे,पांढरा कफ पडणे,खोकला येणे अश्या लक्षणांमध्ये कारल्याचा (Bitter Gourd) रस,मध,मिरे असे मिश्रण घेतले तर लाभ दिसून येतो.

२.सातत्याने जंत होवून सर्दि ,खोकला,पचनाच्या,त्वचेच्या तक्रारी ,शौच्याच्या जागी खाज,मळमळ असल्यास कारल्याचा रस,वावडिंगचुर्ण घेवून झोपतांना एरंडेल घ्यावे.

३.सतत लघवीला जावे लागणे,खूप प्रमाणात लघवी होणे,लघवी पश्चात थकवा जाणवणे,शरीर जड पडणे,थकवा येणे अश्या तक्रारींमध्ये कारल्याची भाजी,गव्हाचे फुलके तूप तेल न लावता खावे,दुपारी झोपू नये ,योग्य तो व्यायाम करावा.

४.मधुमेहावर  कारली गुणकारी असतात असे समजून सगळेच मधुमेहाचे रुग्ण कारल्याचा रस घेतात पण सगळ्यांनाच कारले उपयोगात येईल असे नाही याने त्रास होव्वू शकतो.

५.अनेक जण नॉयलॉन ,टेरिलीन,यासारखे कपड्यांचे प्रकार लोक घालत असतात.या कपड्यांनी घाम जास्त येवून तो त्वचेत मुरतो व यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार उत्पन्न होतात,यात खरूज,इसब,असे लहान लहान क्षुद्र त्वचाविकार येतात यामध्ये कारल्याचा रस,हळद पोटातून द्यावे तसेच हेच मिश्रण त्त्वचेवर लावून आंघोळ करावी.

६.अंगावर फोड येणे,वेगवेगळे चट्टे पडणे,पांढरे डाग पडणे अश्या लक्षणात कारल्याचा रस द्यावा,व एरंडेल तेल घ्यावे.

७.अंगात बारीक बारीक ताप येणे,आळस-सूस्ती राहणे,तोंडाला पाणी सुटणे,गोड तोंड राहणे,भूक नसणे,जीभेवर पांढरा थर तयार होणे यात कारल्याचे पाणी दिवसभर थोडे थोडे प्यावे.

८.पोटात आग होणे,मळमळ होणे,अंगावर पित्त येणे यात कारल्याचा रस उपाशीपोटी घ्यावा.

९.डोळ्याची हातापायाची आग होत असल्यास कारल्याचा रसाचा घड्या ठेवावयात.

१०.जखमा होवून त्यातून स्त्राव येत असतील तर कारल्याचा रस लावावा.

निषेध

१.कारल्याचा अति वापर टाळावा ,पित्ताचे त्रास होण्याचा संभाव असतो व पित्ताचे विकार वाढतात.

२.मधुमेहींनी सर्रास वापर टाळावा

३.लघवीला जळजळ होणे,कमी होवून वेदना होणे यात कारले टाळावे

४.वजन कमी होणे ,थकवा येणे,चक्कर येणे,तहान अतिप्रमाणात अश्या ठिकाणी कारल्याचा वापर टाळावा.

चेतावनी

१.कारल्याचा वापर उपचाराकरीता वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०