सर्वात वर

तरुणपणीच गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन करणे महत्वाचे  

तरुणांनी नोकरी लागल्या पासूनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही पदवीधर झाल्या नंतर करिअरची सुरुवात केली असेल तर बचत करण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वत:साठीच्या खर्चासाठी, विविध कामे तसेच आरामदायी जीवनजगण्या करिता पैसे बाजूला ठेवून दीर्घकालीन योजना आखण्यासाठीचा दृष्टीकोन योग्य असू शकतो. वेळोवेळी गुंतवणूक केल्याने व्याज वाढेल. त्यामुळे स्वतःसाठी फोर व्हिलर , घर खरेदी खरेदी किंवा सुटीवर जाण्याची वैयक्तिक इच्छा होईल तेव्हा तरुणपणी केलेला पैशांचा झालेला संचय कामाला येईल. तरुणपणी गुंतवणूक केल्याने होणा-या विविध फायद्यांविषयी Angel Broking Ltd.चे वरिष्ठ इक्विटी संशोधन विश्लेषक श्री जयकिशन परमार यांनी काही मुद्दे मांडले आहेत.

चक्रवाढ व्याज लक्षात ठेवून बचत करणे:

जेव्हा शिक्षण पूर्णकरून नवी नोकरी लागते तेव्हा खर्च कमी होतो, असे दिसून येते. त्यामुळे याच काळात लहान लहान रकमेची बचत आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा घेत, वेळोवेळी संपत्ती कशी वाढवता येईल, हे पाहणे योग्य ठरते. तसेच, पगार जमा होतो तेव्हा ते Recurring Deposit, Fixed Deposit, Provident Fund इत्यादीमध्ये जमा करता येतो. त्यामुळे काही काळानंतर पैसे वाढतात व वेळेप्रसंगी जेव्हा गरज असते, तेव्हा ती रक्कम त्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते . सातत्याने बचत केल्यानंतर ३० ते ४० वर्षांनंतर त्यांची रक्कम किती होईल, याची कल्पना करा. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अशा व्यक्तीला निवृत्ती पश्चात खूप आराम मिळून जीवन सुखकर होऊ शकते.

२१ व्या शतकात गुंतवणूक करणे अधिक सोपे:

आजच्या तरुण पिढीमध्ये एक नवा ट्रेंड दिसून येतो. त्यांना बँकआणि इतर वित्तीय सेवा प्रदात्यांकडून मिळालेले विविध पर्याय आजमावून पाहण्यात त्यांना कमालीचा रस आहे. ९० किंवा २००० च्या सुरुवातीच्या काळाप्रमाणे किचकट न भासता ही सर्व प्रक्रिया आता फक्त एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.Banks, Brokerage Firms, Mutual Funds इत्यादींसारख्या वित्तीय संस्थांनी त्यांचे स्वत:चे Mobile app लाँच केले असून त्यामुळे लाखो तरुणांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी केवळ गुंतवणूक करायला सुरुवात केली असे नाही तर Mutual Funds, Bonds, Stocks and Modities Markets मध्ये गुंतवणूक करण्याची माहितीही ते घेत आहेत असे चित्र दिसून येते आहे.

कौटुंबिक भविष्यासाठी नियोजन:

स्वतःचे आयुष्य जगताना भविष्यात अनेक जबाबदाऱ्या जोडल्या जातात. त्यामुळे आर्थिक नियोजन महत्वाचे आहे ते नसेल तर भविष्यात मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. लग्नानंतर जवाबदाऱ्या वाढतात, मूल झाल्यानंतर तर खर्च चौपट होऊ शकतो. यातच जर नियोजनाचा अभाव असेल तर आणखी मोठा खर्च झेलावा लागू शकतो. तरुणपणीच गुंतवणूक केल्यास एक सुरक्षिततेची जाणीव होते. मग कुटुंबात जेव्हा तीव्र गरज असतात , घरात आवश्यक वस्तू खरेदी करायच्या असतात, तेव्हा याचा मोठा फायदा होतो.

अनपेक्षित करिअर बदल आणि स्वत:ची गुंतवणूक:

सध्याच्या परिस्थितीत जगातील इंडस्ट्रीमध्ये दर वर्षांनी काही ना काही बदल होत असताना कामाच्या ठिकाणीही अचानक बदल होऊ शकतो. एखाद्या स्त्री किंवा पुरुषाने विशिष्ठ परिस्थितीत करिअर सुरू करण्याची योजना आखली असेल, तेव्हा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्न करावेच लागतात. पण तरुण वयापासूनच आर्थिक दृष्टीकोनातून भविष्याचा निर्णय घेतले गेले असतील तर करिअर मधील महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेता येतात. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने असल्यास तो व्यक्ती अतिरिक्त शैक्षणिक अभ्यासक्रम करू शकतो किंवा जग फिरू शकतो. आर्थिक नियोजन केल्याने लोकांना असंख्य संधी आणि मनासारखे जीवन उपभोगण्यास मिळू शकते.

Jaikishan Parmar
श्री जयकिशन परमार