सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ आज १३८६ संशयित तर ३१९नवे रुग्ण

२४ तासात जिल्ह्यात २५२ जण कोरोना मुक्त तर ६ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात कोरोनाचे ४०३० अहवाल येणे बाकी 

नाशिक- आजही नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये  वाढ बघायला मिळत असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३१९ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.तर कोरोना संशयित म्हणून १३८६ रुग्ण आढळले आहे तर जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ४०३० अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे.त्यामुळे नाशिककरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.आज शहरात १८० तर ग्रामीण भागात कोरोनाचे १३९ नवे रुग्ण आढळल्याने काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत होती.परंतु दिवाळी नंतर वाढलेल्या गर्दी नंतर कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढल्याचे जाणकारांचे मत आहे.गेल्या २४ तासात कोरोनामुळे जिल्ह्यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.३० टक्के इतका झाला आहे. गेल्या ४८ तासात २५२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २५५६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५१३ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १८० मालेगाव मध्ये ०३,नाशिक ग्रामीण १३१ ,जिल्ह्या बाह्य ०५ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.३७,टक्के, नाशिक शहरात ९६.३० टक्के,मालेगाव मध्ये ९३.९७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात १८० जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ४३२ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६५,००३ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६२,५९६ जण कोरोना मुक्त झाले असून १५१३ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 
१) जयप्रकाश हाउसिंग सोसायटी जेल रोड नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०५

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७६१

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८९४

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०७

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१३०२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०१

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -४०३०

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)