सर्वात वर

मेथांबा

शीतल पराग जोशी

आता सध्या कैरीचा मोसम आहे. कैरीच्या वेगवेगळ्या रेसईपी आपण करू शकतो. आणि गुळाने हिमोग्लोबिन  पण वाढते. मग काय करून बघणार ना तुम्ही पण असा आंबट गोड मेथांबा(Methamba).काही प्रदेशात अथवा काही भागात या रेसिपीला कैरीचे रायते असे हि म्हणतात 

(Methamba)

साहित्य : 2 कैरी, 2 वाटी गुळ, 1 टीस्पून मेथ्या, तेल, 1 टीस्पून हिंग 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, मीठ

कृती : 2 कैऱ्या घेऊन त्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. नंतर कैरीचे वरचे साल काढून घ्यावे. खूप साल काढू नये.  नंतर कैरीच्या फोडी करून घ्याव्या. खूप बारीक फोडी करू नये. नंतर एक स्टील पातेले घेऊन त्यात तेल घालून त्यात जिरे टाकावे. ते तडतडले की त्यात हिंग, मेथी दाणे घालावे. नंतर तिखट,हळद घालून कैरीच्या फोडी घालाव्या. त्यावर झाकण ठेवून द्यावे. आणि झाकणावर पाणी घालावे. फोडी छान शिजल्या की त्यात मीठ आणि गूळ घालावा. आंबट वाटत असल्यास गूळ अजून घालावा. असा सुंदर मेथांबा सगळ्यांना खूप आवडतो.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी


संपर्क-९४२३९७०३३२