सर्वात वर

आगामी काळात या आयपीओमध्ये असेल गुंतवणूकीची संधी

मुंबई – सध्या स्टॉक मार्केट सर्वोच्च पातळीवर आहे. आयपीओ मार्केटदेखील सक्रिय होत आहे. कारण आपण मागील २ आठवड्यांपासून आयपीओच्या अनेक बातम्या येत असल्याचे आपण पाहिले आहे. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले.

पुढील काही महिन्यात ऑनलाइन पोर्टल झोमॅटो, कार ट्रेड आणि फार्मा सेक्टरमध्ये ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस यासारख्या विविध क्षेत्रांतून आपल्याला आयपीओ (IPO) दिसतील. या सर्वांसह भारताच्या इतिहासात २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत येणारा सर्वात मोठा आयपीओ (IPO) आहे. पेटीएम (One97 Communication) आयपीओचा आकार सुमारे ₹२१०००-₹२२००० कोटींमध्ये असून त्याचे एकूण मूल्य १,८०,००० कोटी रुपयांचे आहे. मागच्या वेळी २०२० मध्ये सर्वात मोठा आयपीओ कोलइंडियाचा ₹१५,४७५ कोटींचा होता.

काही आयपीओमध्ये (IPO)आम्हाला दीर्घकालीन शक्यता वाटते. तर काहींमध्ये थोड्या नफ्याची शक्यता वाटते. त्यामुळे गुंतवणूकदार येत्या काही महिन्यांत आयपीओ मार्केटमधील चांगल्या रिटर्नसाठी तयारी करत आहेत. पूर्वीच्या वर्षी आम्ही नाझारा टेक्नोलॉजीज (४३% वृद्धी), एमटीएआर  टेक्नोलॉजीज (८८% ची वृद्धी) अशा अनेक स्टॉकमध्ये चांगले लिस्टिंग मिळवून दिले. पुढील काही महिन्यांत काही नव्या आयपीओंची अशाच प्रकारची कामगिरी आम्हाला अपेक्षित आहे. विविध मार्केट रिपोर्टनुसार, झोमॅटो, कार ट्रेड, ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आणि आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी सारखे आयपीओ पुढील काही तिमाहीत आयपीओच्या (IPO) तारखा निश्चित करत आहेत.