सर्वात वर

नाशिक शहरात उद्यापासून जनता कर्फ्यू : सहभागी होण्याविषयी केले आवाहन

नाशिक – नाशिक मध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे.दररोज हजारो रुग्ण वाढता आहेत.कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आता नाशिक मधील अनेक संघटना एकत्र आल्या असून सर्व संघटना मिळून एकत्रीत पणे जनता कर्फ्यू (Janata Curfew) करण्याचे निश्चित केले आहे.उद्या दिनांक १९ एप्रिल पासून हा १० दिवसांचा जनता कर्फ्यू (Janata Curfew) असणार आहे शहरातील विविध व्यापारी संघटनांनी या जनता कर्फ्यूस पाठिंबा दिला आहे.या जनता कर्फ्यूमध्ये (Janata Curfew) नाशिककर नागरीकांसह सर्व संघटनांनी स्वयंस्फुतीने सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक सिटीझन फोरम आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर तर्फे करण्यात आले आहे.  

जनता कर्फ्यू बाबत नाशिक सिटीझन फोरमचे जाहीर आवाहन 

खरंतर आपल्या नाशिकचे नाव विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे आजवर अनेकदा देशभरात वरच्या क्रमांकावर राहिल्याचा अभिमान आपण बाळगत आलो आहे. परंतु आजमितीस मात्र नाशिकचे नाव कोरोना प्रसारामध्ये राज्य आणि देशभरात झळकल्यामुळे आपण सगळेच अस्वस्थ झालो आहोत. गेल्यावर्षी आपण नाशिकमध्ये कोरोनाला बराच काळ थोपवून धरण्यात यशस्वी ठरलो. यावेळी मात्र परिस्थिती विपरीत आहे. ती सुधारण्यासाठी नाशिकमधील विविध राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांना आणि मिडीयाला स्वयंस्फूर्तीने पुढे यावे लागेल. 

कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेली इंजेक्शन्स, औषधे, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर बेड यांचा सर्वत्र आहे तसाच तुटवडा नाशिकमध्येही निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन-पोलीस त्यांच्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेच. पण, त्याचवेळी त्यांना त्यांच्या नैमित्तिक प्रशासकीय जबाबदाऱ्याही पार पाडायच्या आहेत. शासन-प्रशासन-पोलीस आणि आरोग्य सेवा देणारे सर्वच जण तब्बल वर्षभरापासून कामाचा मोठा ताण सहन करत आहेत. बाधितांना सेवा पुरविणे व मनुष्यहानी कमी करणे हे त्यांच्यापुढील सर्वोच्च प्राधान्याचे काम आहे. अशावेळी संसर्ग होण्यास अटकाव करण्याची जबाबदारीही त्यांच्याच माथी मारण्याऐवजी सर्वच राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार आणि औद्योगिक संघटनांनी तसेच मिडीयाने कोरोना संसर्गाला अटकाव करण्याचे आव्हान स्विकारणे गरजेचे आहे. त्यासाठी एक तातडीचा उपाय म्हणजे  आपण सर्वांनीच पुढील दहा दिवस नाशिक शहरात जनता कर्फ्यू घडवून आणावा. हा अंतिम अथवा एकमात्र उपाय नाही, हे मान्य केले तरी सध्यस्थिती नियंत्रणात आणण्यास त्याची निश्चितच मदत होईल, अशी आशा वाटते.

नाशिक सिटीझन्स फोरमने जनता कर्फ्यूची संकल्पना मांडल्यानंतर तिला विविध स्तरांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मा. पालकमंत्री, मा. महापौर आणि प्रशासनाकडून फोरमच्या या भूमिकेचे स्वागत केले गेले. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरनेदेखिल यासंदर्भात एका ऑनलाईन बैठकीत विविध संघटनांच्या सुमारे साठ प्रतिनिधींची मते जाणून घेतली. त्यात क्रेडाई, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, हार्डवेअर अँड पेंटस् मर्चंट असोसिएशन अशा अनेक संघटनांनी या भुमिकेला दुजोरा दिला आहे. 

म्हणूनच आपणास जाहिर आवाहन आहे की, 
उद्या, सोमवार दि. १९ एप्रिल २०२१ पासून पुढील दहा दिवस आपण नाशिक शहरात स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यूमध्ये (Janata Curfew) सहभागी व्हावे. अत्यावश्यक सेवेत असलेल्या भाजीपाला, फळे व दुध विक्रेत्यांनीदेखिल केवळ सकाळी ७ ते १० आणि किराणा दुकानदारांनी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, अशी विनंती करत आहोत!


नाशिक शहरात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आवाहन – श्री. संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

 देशात व राज्यात करोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामध्ये नाशिक शहराचा क्रमांक एक आहे. त्यामुळे नाशिक शहरांमध्ये करोनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी उद्या दिनांक १९ एप्रिल २०२१ असून दहा दिवस होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हावे.  याविषयी काल झूम ॲपवर ४ वाजता झालेल्या बैठकीत सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी सर्वानुमते जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने या जनता कर्फ्यू मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.

जनता कर्फ्यू मध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या भाजीपाला फळे दूध विक्रेत्यांनी सकाळी ७ ते १० व किराणा विक्रेत्यांनी सकाळी ८ ते १ या वेळेत आपले व्यवसाय सुरू ठेवून सहकार्य करावे व जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हावे.असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले आहे. या सर्वांनी मिळून जनता कर्फ्यूमध्ये (Janata Curfew) सहभागी होऊन जनता कर्फ्यू यशस्वी करूया असे ही त्यांनी संगितले.