सर्वात वर

कुरडईचा उपमा

रेखा केतकर,नाशिक 

साहित्य :(Kurdai Upma) ८ ते १० कुरडया , २/३ सुक्या लाल मिरच्या , अर्धी वाटी भिजलेली उडदाची डाळ , १ छोटं लिंबू , मीठ , साखर २/३ मिडीयम चिरलेला कांदा , कडीपत्ता , अर्धी वाटी कोथिंबीर , अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा किस ,

कृती : प्रथम एका वाटीत उडदाची डाळ भिजवून घ्यावी आणि एका बाउल मध्ये कुरडयांचा  चुरा पण भिजत ठेवावा , कढईत २/३ चमचे तेल टाकून ते तापल्यावर त्यात मोहोरी , हिंग , भिजलेली उडदाची डाळ , चिरलेला कांदा आणि कडीपत्ता टाकून मिश्रण छान परतून घ्यावं , शिजताना त्यात चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी , कांदा आणि उडदाची डाळ गुलाबी रंगाची झाली की त्यात भिजलेल्या कुरडई चा चुरा टाकावा ( एका चाळणीत कुरडईच्या चुऱ्याच पाणी निथळून घ्यावं ) नंतर त्या मिश्रणाला छान वाफ येऊ द्यावी मग त्यात एक छोटं आक्ख लिंबू पिळून घ्यावं आणि वरून ओलं खोबर आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावं रुचकर टेस्टी कुरडईचा उपमा (Kurdai Upma) तय्यार

संपर्क – 9004657496