सर्वात वर

नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या ऑक्सिजन टाकीतुन गळती : २२ जणांचा मृत्यू

२२ जणांचा मृत्यू : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

नाशिक – नाशिक मध्ये महानगर पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील (Zakir Hussain Hospital) कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला आज साडेबाराच्या सुमारास गळती लागल्याची बाब समोर आली आहे. ऑक्सिजन रिफील करतांना टाकीमधून मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजनची गळती सुरु झाली ऑक्सिजन गळती मुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.आता आलेल्या वृत्ता नुसार २२ रुग्ण दगावले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले असून ऑक्सिजनची गळती थांबविण्याचे काम सुरु आहे. 

झाकीर हुसेन हॉस्पिटल (Zakir Hussain Hospital) मध्ये सध्या १५० रुग्ण होते. त्यातील ६७ रुग्ण व्हेंटिलेटर वर होते कोरोनाचे रुग्ण असून त्याच्यातील काहींजण ऑक्सिजन सपोर्ट वर आहेत अशा रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्याचे काम सुरु झाले असून काही जणांना तात्पुरते ऑक्सिजन सिलेंडरलावून उपचार सुरु आहेत.नाशिक जिल्हा रुग्णालयातून तातडीने १५ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर झाकीर हुसेन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रेस्क्यू टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

ऑक्सिजन टाकीत भरत असता ही घटना घडली ,

झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) १५० रुग्ण होते. त्यातील २३ जण व्हेटीलेंटवर होते, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. या घटनेमुळे ३०-३५ जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात वर्ग केले जात आहे. चिंताजनक असलेल्या त्वरित उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

या घटनेची (Zakir Hussain Hospital)  उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल  सांगण्यात आले आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital)  टँकर मधून ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु त्यावेळी लिकेज मुळे ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल रुग्णांना होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने या घटनेत या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

(Zakir Hussain Hospital) घटनास्थळी महापौर सतीश कुलकर्णी ,खा.हेमंत गोडसे ,शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,समता परिषदेचे नेते दिलीप खैरे यांनी ही तातडीने भेट दिली.  

मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर :  उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत असे जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे असे हि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले 

कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले  ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.

यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.