सर्वात वर

सोलापूर : करमाळ्यातील नरभक्षक बिबट्या ठार

सोलापूर : करमाळा तालुक्यात तीन जणांचा बळी घेऊन दहशद माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला(Leopard Attack) मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे. सायंकाळी ६:३० च्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पहिले.त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता.परंतु बिबट्याला वेढल्यानंतर या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या झाडलेल्या गोळीने बिबट्या ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. वांगी रांखुडे परिसरात पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.अखेर या नरभक्षक बिबटयाला(Leopard Attack) ठार करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या २० दिवसापासून वनविभागाचे कर्मचारी या नरभक्षक बिबटयाला पकडण्यासाठी प्रयत्नशील होते. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून या मोहिमेत मध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यानंतर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र,बिबट्याचा वेध घेण्यासाठी अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी १५ फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर ३ गोळ्या झाडल्या आणि बिबट्याला ठार केले. ठार झालेला नरभक्षक बिबट्या वनखात्याने उत्तर तपासणी साठी ताब्यात घेतला आहे.