सर्वात वर

आज लॉक डाउनची घोषणा ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८:३० वाजता जनतेशी संवाद साधणार

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रात्री साडे आठ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्यात लॉक डाऊन (Lockdown) बाबत मोठा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.आज रात्री जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यात लॉक डाऊनची घोषणा करतील असे वृत्त आहे.आजच दुपारी मुंबईचे पालकमंत्र्यांनी  राज्यात लवकरच लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा होईल असे व्यक्तव्य केले होते. 

राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून राज्यात दररोज पन्नास हजाराच्या वर कोरोना बाधितांची संख्या होते आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.त्यामुळे आज मुख्यमंत्री काय घोषणा करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.