सर्वात वर

Nashik : कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ ,आज १४४६ संशयित तर ४४१ नवे रुग्ण

२४ तासात नाशिक शहरात आज २८० तर ग्रामीण भागात १६१ कोरोनाचे नवे रुग्ण : ४९३ जण कोरोना मुक्त

नाशिक-आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात ४४१ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी शहरात २८० तर ग्रामीण भागात १६१ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात  संशयितांमध्ये वाढ झाली आहे जिल्ह्यात कोरोनाचे १४४६ रुग्ण आढळले आहे. तर ४९३ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १६४५ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे तर कोरोना मुळे जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.३७ टक्के इतका झाला आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २७०५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १४८८ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २८० मालेगाव मध्ये १३,नाशिक ग्रामीण १४१,जिल्ह्या बाह्य ०७ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.९० टक्के, नाशिक शहरात ९६.३७ टक्के,मालेगाव मध्ये ९३.७१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.७९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात २८० जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५५२ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६५,९१४ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६३,५२४ जण कोरोना मुक्त झाले असून १४८८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) तपोवन रोड ,नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) घर नंबर ९२९२,स्वारबाबा नगर, हनुमान चौक,सातपूर येथील ३६  वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७७७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९०१

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:३० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०८

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१३७५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०८

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०८

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४७

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -१६४५

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)