सर्वात वर

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा रद्द : राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावीची परीक्षा रद्द(10th class exams canceled) करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणं महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. बारावीच्या परीक्षा होतील,अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.