सर्वात वर

अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाच्या पदावरून मेघराज भोसले यांची हकालपट्टी


मुंबई-
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदावरून मेघराज भोसले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महामंडळाच्या बैठकीत संचालकांनी आठ विरुद्ध चार अविश्वास ठराव मंजूर करून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. 

माझ्या पाठीत खंजीर खुपसला, मी कोणालाही सोडणार नाही. या विरोधात कोर्टात धाव घेऊन मी पुन्हा पदावर बसणार या कटाच्या मागे सुशांत शेलार असून त्यांना अध्यक्ष व्हायचं आहे अशी प्रतिक्रिया मेघराज भोसले यांनी व्यक्त केली. 

मेघराज भोसले यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध हा अविश्वास ठराव आणला होता आणि आठ विरुद्ध चार अशा मताने तो मंजूर करण्यात आला असे सुशांत शेलार यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले