सर्वात वर

संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होणार – संतोष मंडलेचा

छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची मागणी 

लॉक डाऊन बाबत निर्णय न झाल्यास सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम

नाशिक – उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा (Lock Down) निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होण्याचा निर्णय झाला असून संपूर्ण लॉकडाऊन न झाल्यास ८ तारखेला झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम तसेच छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची मागणी करण्यात आली आज व्यापारी संघटनांच्या बैठकीत झाल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड  ॲग्रिकल्चर तर्फे आज दि. १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी ६ . ३० वाजता ” लॉकडाऊन (Lock Down)व  ब्रेक द चेन, पुढे काय ? ” या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची  झूम ॲपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली.त्या मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.