सर्वात वर

Mount Everest : माऊंट एव्हरेस्टच्या उंची बाबत अधिकृत माहिती जाहीर

जगातील सावंत उंच शिखर समजल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्टच्या उंची बाबत तर्क वितर्क सुरु असतांनाच नेपाळ आणि चीन यांच्यातील एका प्रदीर्घ चर्चेनंतर Everest बाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधीच्या उंचीपेक्षा ८६ सेंटीमीटरने म्हणजे ( जवळपास तीन फुटांनी) वाढल्याची माहिती आता समोर येते आहे.नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली तर चीनकडून वॅंग यी यांनी हे संयुक्त निवेदन जाहीर केले आहे. याआधीच्या उंचीत ८६ सेंटीमीटर इतकी नवी उंचीची भर असल्याचे नव्या तपासणीतून समोर आले आहे.

माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर झाली असून या उंचीत आता तीन फुटांची वाढ झाल्याने या विक्रमात आता पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून माऊंट एव्हरेस्टच्या उंची संदर्भात नेपाळ आणि चीन यांच्यामध्ये सातत्याने बैठका सुरु होत्या. सातत्त्याने सुरु असलेल्या या बैठकांनंतर आता अखेर माऊंट एव्हरेस्टची उंची तीन फुटांनी वाढली आली असल्याचे नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांमार्फत एका संयुक्त निवेदनात जाहीर करण्यात आले आहे.

यापूर्वी १८४७ साली भारतात आलेल्या एका ब्रिटीश सर्वेक्षणकर्त्यांने या शिखराची उंची मोजली होती. त्यावेळी मोजलेली उंची ८७७८ इतकी होती. नेपाळ २०११ सालापासून Mount Everest ची उंची मोजण्याची मोहीम राबवत होता.भारतातच १९५४ साली माऊंट एव्हरेस्ट शिखराची अधिकृत मोजणी झाली होती. सर जॉर्ज एव्हरेस्ट या भारतात असलेल्या सर्वेक्षणकर्त्याच्या नावावरूनच या शिखऱाला एव्हरेस्ट असे नाव मिळाले होते.