सर्वात वर

MUMBAI : लालबागमध्ये सिलेंडरचा स्फोट ,२० जण जखमी

मुंबई- मुंबईतील लालबागच्या गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीतील बंद खोलीत आज सकाळची ७ वाजून ४५ मिनिटाने गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.या दुर्घटनेत २० जण होरपळून जखमी झाल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.काही वेळानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

मागील काही दिवसांपासून स्फोट झालेल्या खोलीमध्ये गॅस लीकेजचा वास येत होता. रविवारी सकाळी वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक शोध घेण्यासाठी गेले असता अचानक भीषण स्फोट झाला.जखमींना तात्काळ उपचारासाठी केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.