सर्वात वर

मुंबई-मनमाड विशेष रेल्वे मंगळवारी रद्द

मध्य रेल्वेने काढले पत्रक 

नाशिक – पंचवटी एक्सप्रेसच्या वेळेत मनमाड वरून मुंबईला जाणारी मनमाड – मुंबई  विशेष गाडी (Mumbai-Manmad special train) उद्या मंगळवार (दि.१३ एप्रिल) रोजी रद्द करण्यात आली असल्याचे  पत्रक मध्य रेल्वेने काढले आहे. या गाडीने नियोजित प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा गोंधळ उडणार आहे. त्यामुळे सकाळी मुंबई कडे जाणाऱ्या आणि मुंबई वरून येणाऱ्या व्यक्तींनी नोंद घ्यावी 

प्रसिद्धी पत्रकात मध्य रेल्वेने काय म्हंटले आहे. 

मनमाड मुंबई विशेष गाडी रेल्वे प्रशासन द्वारा तांत्रिक कारणा मुळे गाडी क्रमांक ०२११० अप मनमाड मुंबई विशेष गाडी (Mumbai-Manmad special train) दिनांक १३/०४/२०२१ रोजी रद्द करण्यात आली आहे.याची संबंधितांनी नोंद घ्यावी.