सर्वात वर

नाट्यमय घडामोडी नंतर चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मेघराज भोसले

Meghraj Bhosle
Meghraj Bhosle Became The President Of The Film Corporation Again

मुंबई- अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी  पुन्हा एकदा मेघराज भोसले यांची निवड करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळात अविश्वास ठराव आणून विद्यमान अध्यक्ष मेघराज भोसले यांना हटवण्यात आले होते.आज पुन्हा नाट्यमय घडामोडीनंतर मेघराज मेघराज भोसले यांची निवड काण्यात आली आहे.

 मागील महामंडळाच्या बैठकीत संचालकांनी मेघराज भोसले यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध हा अविश्वास ठराव आणला होता आठ विरुद्ध चार असा अविश्वास ठराव मंजूर करून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड केली होती.आणि  मेघराज भोसले यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. 

माझ्या पाठीत खंजीर खुपसला, मी कोणालाही सोडणार नाही. या विरोधात कोर्टात धाव घेऊन मी पुन्हा पदावर बसणार या कटाच्या मागे सुशांत शेलार असून त्यांना अध्यक्ष व्हायचं आहे अशी प्रतिक्रिया मेघराज भोसले यांनी व्यक्त केली होती.

पुढील सहा  महिन्यात महामंडळाच्या निवडुका आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला असावा असा सूर काही संचालकांनी जनस्थानशी बोलतांना व्यक्त केला.

आजच्या बैठकीत अभिनेते सुशांत शेलार यांनी पुष्पगुच्छ देऊन  मेघराज भोसले यांना शुभेच्छा दिल्या .