सर्वात वर

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

मुंबई-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. खा. संजय राऊत यांनी ट्विट करून हि माहिती दिली आहे.काही कामानिमित्त ते गोव्यात होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता.मोहन रावले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जात. 

मोहन रावले दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. मोहन रावले गेले, असे सांगत कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले नेते असे वर्णन करत संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मोहन रावले यांचे पार्थिव  दादर मधील त्यांच्या घरी आणणार आहे त्यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळच्या शिवसेना शाखेत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणारअसून त्यानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.