सर्वात वर

Mumbai : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

मुंबई-ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते ८३ वर्षांचे होते.त्यांना शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्का केले जाणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक नाटकांमध्ये आणि दोनशे हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.झी मराठीवरील अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका निभावली.या मालिकेच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण टीम सोबतच मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

वयाच्या ६ व्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात पाऊल ठेवलं होतं. १९४४ मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. त्याचप्रमाणे आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते .विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले.

‘अशा असाव्या सुना’ १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. त्याच प्रमाणे सिंहासन, उंबरठा, बिनकामाचा नवरा ते नुकताच आलेला हरी ओम विठ्ठला हे रवी पटवर्धन यांचे चित्रपट. एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिंहा’, ‘हमला’ हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ‘झंजार’ या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.