सर्वात वर

Nashik Corona : शहरात आज १५३ तर ग्रामीण भागात ८० कोरोनाचे नवे रुग्ण

२४ तासात जिल्ह्यात १७४ जण कोरोना मुक्त तर ४ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात कोरोनाचे ८४८ संशयित 

नाशिक-आजही नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्ह्यात २३३ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी शहरात १५३ तर ग्रामीण भागात ८० रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोना संशयित म्हणून जिल्ह्यात  ८४८ रुग्ण आढळले आहे तर जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ४०१७ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे..गेल्या २४ तासात कोरोनामुळे जिल्ह्यात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५६ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.२६ टक्के इतका झाला आहे. गेल्या ४८ तासात १७४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २६११ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५३९ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १५३ मालेगाव मध्ये ०३,नाशिक ग्रामीण ६९ ,जिल्ह्या बाह्य ०८ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.३०,टक्के, नाशिक शहरात ९६.२६ टक्के,मालेगाव मध्ये ९३.९० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५६ इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४

नाशिक महानगरपालिका-०३

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७६५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८९७

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०८

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -८०८

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०९

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१६

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -४०१७

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)