सर्वात वर

Nashik Corona : जिल्ह्यात २७३ तर शहरात १९९ कोरोनाचे नवे रुग्ण

४८ तासात जिल्ह्यात २८५ जण कोरोना मुक्त तर १०८१ संशयित दाखल : ६ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.६५ %

नाशिक (प्रतिनिधी)गेल्या दोन दिवसात  जिल्ह्यात कोरोनाचे २७३ तर शहरात १९९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.गेल्या दोन दिवसात  कोरोनामुळे जिल्ह्यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६५ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.०६ टक्के इतका झाला आहे. गेल्या ४८ तासात २८५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण १०८१ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २४९७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६४७ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १९९,मालेगाव मध्ये ७,नाशिक ग्रामीण ६० ,जिल्ह्या बाह्य ०७ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९५.१२,टक्के, नाशिक शहरात ९६.०६ टक्के,मालेगाव मध्ये ९३.३८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.९२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.६५ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात २६६ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ४२१ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६४,३४९ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६१,८१६ जण कोरोना मुक्त झाले असून १६४७ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) घर नंबर ४०,ज्योती स्टोअर्स, नाशिक येथील ९० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.(सदरचा अहवाल दि.१६ व १७ नोव्हेंबर २०२० या दोन दिवसांचा आहे)

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७३६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८८६

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१०४९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -६०२

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)