सर्वात वर

Nashik Corona : जिल्ह्यात ४०२ तर शहरात २६६ कोरोनाचे नवे रुग्ण

४८ तासात जिल्ह्यात ५२६ जण कोरोना मुक्त तर ४८० संशयित दाखल : ५ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.६३ %

नाशिक (प्रतिनिधी)गेल्या दोन दिवसात  जिल्ह्यात कोरोनाचे ४०२  तर शहरात २६६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे जिल्ह्यात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६३ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.०२ टक्के इतका झाला आहे. गेल्या ४८ तासात ५२६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ७:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ४८० कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २५१५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६७० जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २६६,मालेगाव मध्ये १,नाशिक ग्रामीण ७४ ,जिल्ह्या बाह्य ०० रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९५.१७,टक्के, नाशिक शहरात ९६.०२ टक्के,मालेगाव मध्ये ९३.१३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.१२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.६३ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात २६६जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५४३ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६४,१५० रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६१,५९५ जण कोरोना मुक्त झाले असून १६७० जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 
१) प्लॉट क्रमांक ८, धर्मभक्ती रेसिडेन्सी,प्लॉट क्रमांक २,सर्व्हे क्रमांक २०२, रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ, दिंडोरी रोड,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.२) रूम क्रमांक ३, राजश्री पार्क,अशोक नगर, मौले हॉल जवळ, सातपूर घर नंबर २६, जाधव संकुल नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

(सदरचा अहवाल दि.१४ व १५ नोव्हेंबर २०२० या दोन दिवसांचा आहे)

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०५

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७३०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८८५

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ००

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -४६४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ००

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -२७४

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)