सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात १८१ शहरात १२५ नवे रुग्ण

मागील २४ तासात २४० जण कोरोना मुक्त : ७७० संशयित तर आज ८ जणांचा मृत्यू 

नाशिक- आज नाशिक जिल्ह्यात १८१ कोरोनाचे एकूण नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी नाशिक शहरात १२५ तर ग्रामीण भागात ५६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ७७० संशयित रुग्ण आढळले आहे. तर २४० जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक जिल्ह्यात आज ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.३७ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३४०० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २२८० जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १२५ मालेगाव मध्ये ०२,नाशिक ग्रामीण ५२ ,जिल्ह्या बाह्य ०२ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १२७८ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९४.६२ %,नाशिक शहरात ९५.३७ %,मालेगाव मध्ये ९२.५८ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात १२५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६५६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ६९,५१९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६६,३०१ जण कोरोना मुक्त झाले तर २२८० जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) इंदिरानगर, कामठवाडे, नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेल मागे,आडगाव,पंचवटी नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

३) पंचवटी, नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

४) घर क्रमांक ३, चाणक्यपुरी सोसायटी, मखमलाबाद लिंक रोड, नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०८

नाशिक महानगरपालिका-०४

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८७५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९३८

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६९१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –११

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –६१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १२७८

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)