सर्वात वर

Nashik Corona : आज शहरात कोरोनाचे २०७ तर जिल्ह्यात ८१ नवे रुग्ण

२४ तासात २१५ जण कोरोना मुक्त ,९ जणांचा  मृत्यू : दिवसभरात ११०८ संशयीत 

नाशिक- भारतात कोरोनाची लस नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. लस येई पर्यंत सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे.प्रशासन वारंवार सूचना देऊन ही आजही अनेक जण नियम पाळतांना दिसत नसल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतांना दिसते आहे.जिल्हा आरोग्यविभाग अनेक महिन्यांपासून दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची काळजी घेण्याचे काम करत असला तरी नागरिकांनी ही स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. नाशिक जिल्ह्याची परिस्थिती आटोक्यात येतांना दिसत असली तरी सर्वांनी नियमांचे पालन केले तर नाशिक जिल्ह्यातून कोरोनाला आपण लवकरच हद्दपार करू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. 

आज नाशिक जिल्ह्यात ३०२ कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.तर नाशिक शहरात २०७ आणि  ग्रामीण भागात ९४ कोरोनाचे  नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ११०८ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २१५ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात ९ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.२२ टक्केआहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३१०० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६२८ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २०७ मालेगाव मध्ये ०७,नाशिक ग्रामीण ८१ ,जिल्ह्या बाह्य ०७ रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १०७५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.२६ टक्के, नाशिक शहरात ९६.२२ टक्के,मालेगाव मध्ये ९२.९१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात २०७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ७५५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६७,२९८ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६४,७५५ जण कोरोना मुक्त झाले असून १६२८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) खंडेराव मंदिराजवळ, मानकर मळा,मखमलाबाद येथील ८४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

२) सिडको,नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

३) प्लॉट क्रमांक १४१, श्रीकृष्ण, त्र्यंबक रोड महात्मा नगर येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

४) मातोश्री अपार्टमेंट, फ्लॅट क्र.८, जाधव कॉलनी मखमलाबाद येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

५) ताजनपुरे मळा,चेहडी शीव,चेहडी(ब) नाशिकरोड येथील ७४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०९

नाशिक महानगरपालिका-०५

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८१३

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९१५


आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:३० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०४

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१०२७

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –६६

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १०७५

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)