सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात २८३ तर शहरात १४२ नवे रुग्ण

मागील २४ तासात २०७ जण कोरोना मुक्त : ८६२ कोरोनाचे संशयित ;नाशिक शहरात ६ जणांचा मृत्यू 

नाशिक- आज जिल्ह्यात एकूण २८३ चे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात १४२ तर ग्रामीण भागात १४१ कोरोनाचे  नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ८६२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २०७ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक शहरात ६ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८८ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.६३ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३५०२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २०७८ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १४२ मालेगाव मध्ये०६,नाशिक ग्रामीण १३१ ,जिल्ह्या बाह्य ०४ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १२६३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९३.६५ %,नाशिक शहरात ९५.६३ %,मालेगाव मध्ये ९२.६४ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.०२ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.८८ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात १४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६५८ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ६८,७१६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६५,७१० जण कोरोना मुक्त झाले तर २०७८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) काठे गल्ली, द्वारका येथील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

२) फुले नगर, पंचवटी,नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

३) फ्लॅट क्र-८,शिव पॅलेस अपार्टमेंट,नरहरी नगर,अंजना लॉन्स जवळ पाथर्डी फाटा,नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

४) वंदना पार्क, बिल्डिंग क्र-२, फ्लॅट क्र- १७, इंदिरानगर,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

५) पंचवटी, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

६) देवराज कॉम्प्लेक्स, दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०६

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-००

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८४६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९२८

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०७

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७८२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –८०

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १२६३

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)