सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात ३६७ तर शहरात २६२ कोरोनाचे नवे रुग्ण


सिन्नर आणि निफाड तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक : २४ तासात ५३८ जण कोरोना मुक्त ,५ जणांचा  मृत्यू 

नाशिक-आज नाशिक शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजच्या आकडेवारीत वाढ होताना दिसते आहे.आज शहरात २६२ कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.तर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १०५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. शहरा पेक्षा ग्रामीण भागाचा आकडा कमी दिसत असला तरी सिन्नर आणि निफाड मध्ये कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या आकडेवाडी नुसार सिन्नर मध्ये ३०४  तर  निफाड मध्ये २९६ रुग्ण आहेत.पेठ मध्ये एकही रुग्ण नसून सुरगाणा मध्ये केवळ २ रुग्ण आहेत. 

गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ७५० संशयित रुग्ण आढळले आहे. तर ५३८ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६४० अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे तर कोरोना मुळे जिल्ह्यात ५ जणांना आपला जीव गमावला. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४७ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.५० टक्के इतका झाला आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २७९० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १४२९ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २६२ मालेगाव मध्ये ००,नाशिक ग्रामीण १०१,जिल्ह्या बाह्य ०४ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.५२ टक्के, नाशिक शहरात ९६.५०टक्के,मालेगाव मध्ये ९३.४४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.०५ टक्के आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४७ इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०५

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७९१

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९०४

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -७०७

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –००

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ६४०

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)