सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात ७५७ संशयित तर १३२ नवे रुग्ण

२४ तासात नाशिक शहरात आज ९९ तर ग्रामीण भागात ३३ कोरोनाचे नवे रुग्ण : १८१ जण कोरोना मुक्त

नाशिक-आज नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्ह्यात १३२ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी शहरात ९९ तर ग्रामीण भागात ३३ रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोना संशयित म्हणून जिल्ह्यात  ७५७  रुग्ण आढळले आहे तर जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २६७४ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे..गेल्या २४ तासात कोरोनामुळे जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५३ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.२३ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात १८१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २६६० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५६७ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात ९९ मालेगाव मध्ये ००,नाशिक ग्रामीण ३१ ,जिल्ह्या बाह्य ०२१रुग्ण आढळले आहेत.


जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.२७,टक्के, नाशिक शहरात ९६.२३ टक्के,मालेगाव मध्ये ९३.८० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५३ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात ९९ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५०६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६५,४६४ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६२,९९९ जण कोरोना मुक्त झाले असून १५६७ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) १४, अश्विनी सोसायटी,जय भवानी रोड, नाशिक रोड येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०३

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७६९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८९८

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -६८८

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५४

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -२६७४

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)