सर्वात वर

Nashik Corona : आज शहरात १३५ तर ग्रामीण मध्ये कोरोनाचे १३४ नवे रुग्ण

२४ तासात ३६४ जण कोरोना मुक्त, ३ जणांचा मृत्यू : दिवसभरात ७९९ संशयीत 

नाशिक-आज नाशिक जिल्ह्यात २६९ कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात १३५ आणि  ग्रामीण भागात १३४ कोरोनाचे  नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ७९९ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३६४ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात ३ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.०१ टक्केआहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३१९५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १७९२ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १३५ मालेगाव मध्ये ११,नाशिक ग्रामीण १०५ ,जिल्ह्या बाह्य १८ रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण  ७८५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.५८ टक्के, नाशिक शहरात ९६.०१ टक्के,मालेगाव मध्ये ९२.८२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.०२ टक्के आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात १३५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ७१६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६७,९१६ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६५,२०३ जण कोरोना मुक्त झाले असून १७९३ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) जेलरोड, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०३

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८२९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९२१

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:३० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०४

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७५५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १०

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२४

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ७८५

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)