सर्वात वर

Nashik : रेमीडीसिविर मागणीचा..”तो” ई-मेल फक्त रुग्णालयासाठीच – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

हजारो ईमेल मुळे प्रशासनाची वाढली डोकेदुखी  

नाशिक – कोरोना रुग्णांनाच्या उपचारात उपयोगी पडणारे रेमीडीसिविर इंजेक्शनच्या (Remedicivir) मागणीसाठी जो मेसेज व्हायरल झाला आहे.त्यातील ईमेल आयडी हा फक्त रुग्णालया साठीच आहे. त्या इमेल वरून रुग्णांच्या नातेवाईकांनी पाठवलेले जवळपास ४ हजार ई-मेल प्रशासनाला आल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.या मुळे रेमीडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या कक्षातील अधिकाऱ्यांचा वेळ जात असून कृपया या ई-मेल वर नागरीकांनी ई-मेल करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. 

अनेक जणांच्या मोबाईलवर हा संदेश फिरतो आहे.तरी या ईमेलवर नागरीकांनी मागणी करू नये आपला रुग्ण कोविड रजिस्टर रुग्णालयात दाखल असल्यास ते रुग्णालयच आपल्याला  रेमीडीसिविर इंजेक्शन (Remedicivir) उपलब्ध करून देणार आहे.अशी माहिती प्रशासना द्वारे देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांनाच्या उपचारात उपयोगी पडणारे रेमीडीसिविर इंजेक्शनचा (Remedicivir)नाशिक जिल्ह्यात प्रचंड तुटवडा होता.इंजेक्शन मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन पण केले होते. या घटनेची दखल घेत पालक मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. 

जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी रेमीडीसिविर इंजेक्शन हे रूग्णालय पर्यंत शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बाजारात विक्रीसाठी न जाता कोविड रुग्णालयात दाखल गरजू रुग्णाला कशा पद्धतीने पोहचेल असा आराखडा तयार केला.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तयार केलेला हा पॅटर्न आता इतर जिल्ह्यांनी वापरयाला सुरुवात केली आहे. 

या पॅटर्न द्वारे कालच रुग्णालया कडून आलेली मागणी पहिल्याच दिवशी पूर्ण करता आली.जिल्हाधिकाऱ्यांनी स्वहस्ते चार्ट तयार करून दिल्या प्रमाणे हा पॅटर्न राबविण्यात आला.संपूर्ण टीमने कष्टपूर्वक अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातल्या १०१ हॉस्पिटल्स ना ४१५३  इंजेक्शन चे वितरण करण्यात आले यामध्ये शासनाने 10/4/2021 रोजीच्या आदेशाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या सर्व रुग्णांना इंजेक्शन काल मिळाले आहे.