सर्वात वर

Nashik : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ जिल्ह्यात १३६० संशयित तर ३०१ नवे रुग्ण

२४ तासात जिल्ह्यात २२१ जण कोरोना मुक्त तर ८ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.६७ %

नाशिक- दिवाळीनंतर नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ बघायला मिळत असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३०१ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.तर कोरोना संशयित म्हणून १३६० रुग्ण आढळले असून जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार ३३१८ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रगतीपथावर आहे. आज शहरात १६८ तर ग्रामीण भागात कोटोनचे १३३ नवे रुग्ण आढळल्याने आता नाशिककरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत होती.परंतु दिवाळी नंतर वाढलेल्या गर्दी नंतर कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढल्याचे जाणकारांचे मत आहे.गेल्या २४ तासात कोरोनामुळे जिल्ह्यात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.२७ टक्के इतका झाला आहे. गेल्या ४८ तासात २२१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण १३६० कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २४९५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५२२ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १६८ मालेगाव मध्ये ११,नाशिक ग्रामीण ११८ ,जिल्ह्या बाह्य ०४ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.६१,टक्के, नाशिक शहरात ९६.२७ टक्के,मालेगाव मध्ये ९३.९७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.६७ इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०८

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०६

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७५५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८९३

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१२७६

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -३३१८

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)