सर्वात वर

Nashik : गंगापूररोड परिसरात बिबट्याचे दर्शन; दीड तासानंतर बिबट्या जेरबंद

नाशिक – नाशिकच्या गंगापूर रोड वरील सावरकर नगर भागात आज सकाळी बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती .बिबट्याचे दर्शन झाल्या नंतर नागरीकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून माहिती कळवली. तर काहींनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काहीवेळातच वनविभाग,पोलीस आणि महापालिकेचे पथक घटना स्थळी पोहचले.

दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला(Leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे . 

आज सकाळी आठ वाजता नरसिंह नगर परिसरात या बिट्याचे दर्शन झाले होते. पोलिस वनविभाग, आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या नंतर अक्षरधाम अपार्टमेंट जवळ बिबट्याला पकडण्यात यश आली, आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


(सविस्तर माहिती लवकरच अपडेट करत आहोत )