सर्वात वर

कोरोना संसर्गात नाशिक देशात अव्वल ! नाशिक जिल्ह्यात संपूर्ण लोकडाऊनची शक्यता ?

पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक !

नाशिक – नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते आहे.आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण वाढला आहे. त्यातच एका सर्वेक्षणात १० लाख लोकसंख्येमागे कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे. या सर्वेक्षणात कोरोना संसर्गात नाशिक अव्वल स्थानी आल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.त्यामुळे प्रशासनातर्फेआता कडक पाऊले उचलण्याची तयारी सुरु झाली आहे. काही वेळापूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये लॉक डाऊन (Nashik Lock Down) लावण्याचा इशारा दिला असून त्यांनी आज दुपारी ४:३०वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नाशिक जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाउनची (Nashik Lock Down) घोषणा होण्याची शक्यता आहे ?

देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात अत्याधिक असून दररोज ६० हजार पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळता आहेत.मार्च महिन्यातील एका सर्वेक्षणानुसार प्रमुख चार शहरांमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये दहालाख लोकांमध्ये सर्वाधिक रुग्ण नाशिक मध्ये आढळले आहे.या यादी मध्ये नाशिक अव्वलस्थानी असून नाशिक नंतर अनुक्रमे नागपूर, पुणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो.त्यानंतर लखनऊ, बंगरुळु ,भोपाळ,इंदौर ,पाटणा आणि दिल्लीचा क्रमांक लागतो आहे.हे देशातील सर्वधिक प्रभावित शहरे आहेत असे या सर्वक्षणाच्या अहवालात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्यात दररोज सरासरी ३९४७ कोरोना बाधित आढळले आहेत.तर १० लाख लोकांमागे हा आकडा दररोज साधारणतः १८५९ आढळला आहे. संपूर्ण मार्च महिन्यात हा आकडा ९७७६५ रुग्ण आढळले. मार्च महिन्यातील १० लाख लोकांमागे रुग्ण आढल्याचा हा आकडा ४६ हजार ०५० इतका मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. या बाबतचे हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

या सर्व वृत्ताची दखल घेत आज पालकमंत्र्यांनी सायंकाळी तातडीची बैठक बोलावली असून नाशिक मध्ये कडक लॉक डाऊनची (Nashik Lock Down) घोषणा होण्याची शक्यता आहे.असे सूत्रांकडून कळते आहे.