सर्वात वर

नाशिक महानगर पालिका उभारणार लहानमुलांसाठी १०० बेडचे हॉस्पिटल

नाशिक – देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते  या तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्या नंतर नाशिक महानगर पालिकेच्या वतीने (Nashik Municipal Corporation) लहान मुलांवर कोरोनाचे उपचार करण्यासाठी १०० बेडच्या हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन सुरू करण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

तिसरी लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येणारआहे मात्र त्या आजाराने लहान मुले प्रभावीत झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय (Covid Hospital) सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. नाशिक महानगर पालिकेच्या बिटको हॉस्पिटल मध्ये टप्प्याटप्प्याने १०० बेडची व्यवस्था करण्याची तयारी महापालिकेच्या वतीने केली जाणार असून त्यास आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना (Nashik Municipal Corporation) सूचना दिलेल्या असून त्यास गती देऊन  कोरोनाग्रस्त बालकांसाठी रुग्ण सेवा देण्यासाठी  सज्ज करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी दिली  

नाशिक महानगर पालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत देखील विविध पातळीवर काम करत असताना कोविड सेंटर,मनपा रुग्णालयां मध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन केले असून त्या सुविधा दिल्या जात आहेत. तिसरी येणारी लाट लक्षात घेता त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने साधन सामग्रीचे नियोजन केले जात आहे.