सर्वात वर

भाजपा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी गोविंद बोरसे यांची नियुक्ती

नाशिक (प्रतिनिधी) -भाजपा उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुखपदी गोविंद बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र भाजप महाराष्ट्र माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांनी दिले. यापुर्वी त्यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशामध्ये भाजप महाराष्ट्र  प्रदेश सोशेल मीडिया सह सयोंजक  म्हणून  २०१२ ते २०१५ च्या पहिल्याच भाजपच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम केले तसेच आत्तापर्यंत ४ वेळा भाजप महानगर प्रसिद्धी प्रमुखपदी काम केले त्यांच्या या कामाची दखल घेत नाशिक महानगर भाजप प्रसिद्धी प्रमुख पदाबरोबरच भाजप उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१४च्या  लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोशेल मीडियाची प्रभावीपणे धुरा सांभाळली होती आणि त्या नंतर झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ही उत्तर महाराष्ट्र सोशेल मीडिया सयोंजक म्हणून प्रभावीपणे काम केले व सोशेल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता, त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख म्हणून नाशिक महानगर, नाशिक जिल्हा ग्रामीण, मालेगाव, धुळे शहर, धुळे ग्रामीण,नंदुरबार,जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, दक्षिण अहमदनगर, उत्तर अहमदनगर व  अहमदनगर शहर या भाजप संघटनात्मक जिल्ह्याची प्रसिद्धी प्रमुख म्हणून  जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल बोलतांना सांगितले की, आपल्याला दिलेल्या जबाबदारीचा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल. यावेळी त्यांनी  विधानसभा  विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, माजी आरोग्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप महाराष्ट्र  प्रदेश  माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, भाजप प्रदेश सरचिटणीस देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक शहर भाजप अध्यक्ष  गिरीश पालवे,  माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल, भाजप नाशिक शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, प्रदेश सोशल मीडिया सयोंजक प्रवीण अलाई यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष खा.डॉ. भारती पवार, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, खासदार डॉ. सुभाष भामरे, खा.डॉ हिना गावित, महापौर सतिष नाना कुलकर्णी, भाजप जेष्ठ नेते विजय साने,सुहास फरांदे, सभागृह नेते सतिष बापू सोनवणे, गटनेते जगदीश पाटील,आ.राहुल ढिकले, आ.सीमा हिरे, वसंत गिते, सुनिल बागुल, लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, प्रा. सुहास फरांदे, भाजप प्रदेश उद्योग आघाडी अध्यक्ष प्रदीप पेशकर, महानगर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन आण्णा पाटील, जळगाव जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, जळगाव शहर  भाजप अध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, नंदुरबार जिल्हा भाजप अध्यक्ष विजय चौधरी,धुळे जिल्हा भाजप ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील, धुळे शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल, मालेगाव  भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना निकम, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा नाना आहेर, उत्तर नगर जिल्हा भाजप  अध्यक्ष  राजेंद्र गोंदकर, दक्षिण नगर जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे, नगर शहर जिल्हा भाजप अध्यक्ष भय्या गंधे, भाजप माध्यम विभाग प्रदेश सयोंजक ओमप्रकाश चौहान, श्याम सप्रे, सोमेन मुखर्जी, भाजप नाशिक जिल्हा ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, तसेच उत्तर  उत्तर महाराष्ट्रीतील  आमदार, खासदार  लोकप्रतिनिधी,प्रसिद्धी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन आहे.