सर्वात वर

“ग्रंथ तुमच्या दारी “ची विक्रमी घोडदौड सुरू

Nashik News

ग्रंथ तुमच्या दारी तर्फे रुग्णांच्या मनावर पुस्तकांच्या माध्यमातून जपल्या जातील शब्दरूपी संवेदना.

Nashik News

नाशिक : ‘कोरोना’ सारख्या कठीण काळात गुरूजी रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, सेवाभावी वृत्तीने सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवा करत असून त्यांचे धैर्य व धाडस निश्‍चित अभिमानास्पद आहे. रुग्णसेवा ही खरी ईश्वरसेवा आहे. त्याची प्रचिती इथे येते. त्याच संवेदनांना पुरक ग्रंथाचा सहवास त्यांना दिलासा देणारा ठरेल असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रणेते विनायक रानडे यांनी केले.

सुमन जयंत जोगळेकर, लवासा यांच्या सहकार्याने कै. मधुकाका बापट यांच्या स्मरणार्थ ग्रंथ तुमच्या दारी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या योजनेअंतर्गत श्रीमती अंजली मधुकर बापट यांच्या हस्ते श्री. गुरुजी रुग्णालय येथे ग्रंथ पेटी वाचनासाठी उपलब्ध करून दिली या प्रसंगी कै मधूकाका बापट यांचे सुपुत्र अमोल बापट व बापट कुटुंबीय, ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रणेते विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त अ‍ॅड. अजय निकम, श्री गुरुजी रुग्णालयाचे मुकुंद खाडिलकर, प्रकाश भिडे व रुग्णालयाचे पदाधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी तसेच चित्तपवान उद्योजक मंचचे संजय परांजपे, संजीव नेने, अमोल रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रानडे पुढे म्हणाले की, कै. मधुकरकाका बापट यांनी नाशिकच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. गरजूंना त्यांना भरीव मदत व सहकार्य केले. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून ग्रंथपेटी प्रदान करण्यात येत आहे.

ग्रंथ तुमच्या दारी मराठी वाचक जेथे, ग्रंथ तुमच्या दारी तेथे. ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड सुरू आहे. 2 कोटी 25 लाख रुपयांची ग्रंथ संपदामहाराष्ट्र, गोवा, गुजराथ, दिल्ली, सिल्व्हास, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, बे एरिया, सिंगापूर, लंडन, श्रीलंका आदि ठिकाणी पोहोचली असून तिथे वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.