सर्वात वर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

नाशिक- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे आज सकाळी ६:३० वाजता निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. आज दुपारी ३ वाजता त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र अजेय गोटखिंडीकर यांनी दिली आहे.नाशिकच्या पेठे हायस्कूल मधून ते  १५ वर्षपूर्वी सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या निधनाने गणित क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व लोप पावले आहे. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

गोटखिंडीकर सरांनी ७ आंतरराष्ट्रीय गणित परिषदांमध्ये शोध निबंध सादर केले.त्यांची एकूण ७३ पुस्तके प्रकाशित झाली असून मराठी विश्वकोष निर्मिती मंडळात भौतिक शास्त्र व गणित विषयाच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. नाशिकच्या आकाशवाणी केंद्रावर ‘ सफारनामा गणिताचा ‘ ही २६ भागांच्या मालिकेची हि त्यांनी निर्मिती केली होती.स्थनिक वृत्तपत्रात त्यांचे नियमित स्तंभ लेखनाचे काम सुरु होते.त्यांनी २०१३ ते २०१८ या काळात आयडीया वास्तुरचना शास्त्र महाविद्यालयात अध्यापन कार्य केले. 

पुरस्कार आणि सन्मान

(१) जीवन गौरवपुरस्कार- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था 

(२) दीपस्तंभ पुरस्कार- शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण संस्था 

(3) Invited Speaker award – association of mathematics teachers of India 

(४) Distinguished teacher award – Association for International Mathematics Education and Research

(५) मराठी विज्ञान परिषद -सन्मानपत्र 

(६) अतिथी व्याख्याता ९ वे मराठी भाषा विश्व संमेलन,कंबोडिया आणि अनेक स्थानिक सन्मान व पुरस्कार