सर्वात वर

Nashik News : महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाची लागण

नाशिक -(Nashik News) नाशिकचे  प्रथम नागरीक महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली एक्सरे रिपोर्ट द्वारे ते कोरोना पॉझिटिव्ह आहे हे स्पष्ट झाले आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. महापौर सतीश कुलकर्णी हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.