सर्वात वर

Nashik : “रेमेडिसीवर इंजेक्शन”मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन

कागदोपत्री आदेश नको इंजेक्शन द्या अशी रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी

नाशिक – गेल्या अनेक दिवसापासून नाशिक मध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होतांना दिसत आहे. दररोज चार हजाराच्या वर रुग्ण आढळता आहेत. नाशिक मध्ये ऑक्सिजनची ची कमतरता झाल्याने नुकतेच एका हॉस्पिटल मधून रुग्णांना हलवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक रेमेडिसीवर इंजेक्शन (Remdesivir Injection) चा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला असून रुग्णांना हे इंजेक्शन न मिळाल्याने आज रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरून आंदोलन केले.कागदोपत्री आदेश नको इंजेक्शन द्या अशी रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे.

 आज सकाळी रुग्णांचे नातेवाईक नाशिक मधील मेहेर चौकात रस्त्यावर उतररून ठिय्या आंदोलन केले. रेमेडिसीवर इंजेक्शन (Remdesivir Injection) साठी नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे तसेच सकाळ पासून रात्री पर्यंत रांगेत उभे राहूनही आम्हाला हे इंजेक्शन मिळत नसल्याने प्रशासनाने  तातडीने आम्हाला हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी त्यांची मागणी आहे.पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी नातेवाईकांची मागणी आहे.दरम्यान पोलीस प्रशासन घटना स्थळी दाखल झाले आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना रुग्णांसाठी उपचारासाठी आवश्यक असलेले रेमेडिसीवर इंजेक्शन (Remdesivir Injection) मिळावे म्हणून एक आदेश काढला होता. त्याच बरोबर अनेक औषध विक्री करणाऱ्या दुकानावर छापे टाकून चौकशी देखील केली होती. रुग्णांना लवकरात लवकर  रेमेडिसीवर इंजेक्शन मिळेल असाच प्रशासनाचा प्रयत्न सुरु असून लवकरच  रेमेडिसीवर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे प्रशासना तर्फे सांगण्यात आले